*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुढीपाडव्याचा गूढ अर्थ*
पाने झाडून शिशिर झाला मोकळा
पवनास कडुलिंबपुष्पगंधाचा लळा
आता तरुवर शोभे नवपल्लव तुरा
साद घालतो कोकिळ गोड गळा
कोकिळा मान डोलवी आनंदात
बाळ कैरी डोकावी आम्र मोहरात
वावटळ आली पवित्र जल सिंचनास
निसर्ग गुंतला नववर्ष आगमनात
मृत्युंजय अमावस्ये नंतरची प्रतिपदा
विजयाची आरोग्याची देईल संपदा
गुढी उभारु करत हिंदुत्वाची गर्जना
साफल्य-मांगल्य प्रकटेल संपेल आपदा
सानंदे आज गुढी उभारु मांगल्याची
काठी,करा,गाठी,भरजरी साडी-खण,
यासह समजून गुढीपाडव्याचा गूढ अर्थ
करु देशाचे समृद्धी,पावित्र्य संरक्षण
विजया केळकर________
नागपूर
( *संभाजी महाराजांची पुण्यतिथी फाल्गुन अमावस्या
म्हणून तिला मृत्युंजय अमावस्या म्हणतात*)
