*सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित*
सिंधुदुर्ग
आज दिनांक १८ मार्च 2026 रोजी हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था ओगलेवाडी कराड यांच्या मार्फत सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेला सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिव्यांग सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संस्थेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार निर्मिती स्वावलंबन सातत्याने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या कार्याची दखल घेत संस्थेला सामाजिक क्षेत्रात दिव्यांग सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे संस्थेच्या कार्याला नवी ओळख मिळाली असून समाजात सकारात्मक संदेश पसरला आहे.हा पुरस्कार सोहळा पॉलिकल टेक्निकल कॉलेज अक्कलकोटच्या सभागृहामध्ये कल्याणराव इंगळे यांच्या दहाव्या पुण्यतिथीच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. व हा बारावा राष्ट्रीय अक्कलकोट भूषण पुरस्कार सोहळा असून यामध्ये सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याच्या प्रसंगी डॉक्टर प्राची,हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थाचे अध्यक्ष माननीय श्री सुनील फडतरे सर व पदाधिकारी तसेच साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसालचे अध्यक्ष श्री अनिलजी शिंगाडे सर उपाध्यक्ष श्यामसुंदर लोट सर,सहसचिव सुनील तांबे सर कर्मचारी ललित गावडे आदी मान्यवर उपस्थित होते या पुरस्कार सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थिती होती. श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे चेअरमन माननीय महेश इंगळे सर यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेला दिव्यांग सेवा गौरव पुरस्कार मिळाल्याने संस्थेच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला व आभार सर्वांचे मानण्यात आले.
