You are currently viewing श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त मर्डेवाडी येथे विविध धार्मिक कार्यक्रम

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त मर्डेवाडी येथे विविध धार्मिक कार्यक्रम

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त मर्डेवाडी येथे विविध धार्मिक कार्यक्रम

मालवण

मालवण तालुक्यातील मसुरे मर्डेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात २० मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून सकाळी ११ वाजता सत्यनारायण पूजा होईल. त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता स्वामी समर्थ मंत्र पठण होणार असून त्यानंतर स्थानिक भजने सादर केली जाणार आहेत.
या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मठाच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष बाबुराव प्रभूगावकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा