You are currently viewing श्री स्वामी समर्थ भ्रमण गाथा (मोहोळ..)

श्री स्वामी समर्थ भ्रमण गाथा (मोहोळ..)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित श्री स्वामी समर्थ काव्य वंदना*

 

काव्यपुष्प-६६ वे

श्री स्वामी समर्थ भ्रमण गाथा (मोहोळ..)

**************************************

।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

__________________________

वास्तव्यात पंढरीच्या,श्री स्वामींनी

नित्यदर्शन साऱ्या भक्तांना दिले

निवारण त्यांच्या प्रश्नांचे केले

आलेल्या भक्तांना आशीर्वाद दिले ।।

 

पंढरपुराहुन लिलाधरस्वामी निघाले

पुढे ते मोहोळ गावी रहाण्या आले

गावाच्या बाजूने ओढा वहात होता

तो परिसर रम्य,हिरवाईचा होता ।।

 

मोठ्या पाषाणाच्या मागे गुहा होती

स्वामींना वाटलेली योग्य जागा होती

विरक्त,स्वच्छंदीपणाने ते जगत होते

भक्तांच्या कल्याणासाठी फिरत होते ।।

 

घरी पडलेल्या मरणासन्न पुत्राला सोडून

त्याचा पिता स्वामी दर्शनासी आला

त्रिकालज्ञानी स्वामींनी उपाय सांगितला

चिरंजीवाला घोड्यावर बसवा,समुद्रतिरी पाठवा ।।

 

घरी आलेल्या पित्याला चमत्कार दिसला

मरणासन्न पुत्रात, फरक पडलेला दिसला

समर्थ कृपेचा कृपा प्रसाद असे हा

भाव असा त्या पित्याच्या मनी उमटला ।।

___________________________

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

__________________________

कवी अरुणदास” -अरुण वि.देशपांडे- पुणे

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा