You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक पदी राज राजापूरकर…!

सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक पदी राज राजापूरकर…!

*सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक पदी राज राजापूरकर…!*

*निष्ठावंत कोकण सुपुत्राचा सन्मान…!*

कुडाळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षकपदी राज राजापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे साहेब यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र त्यांना सुपूर्द करण्यात आले असून पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले राज राजापूरकर हे निष्ठावंत व सक्रिय पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. सध्या ते पक्षाचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष व प्रदेश प्रवक्ता म्हणूनही कार्यरत आहेत. तसेच ते मा. जितेंद्र आव्हाड साहेबांचे निकटवर्ती असून मा.रोहितदादा पवार यांच्यासोबत अनेक आंदोलने व संघर्ष यात्रांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा आणि देशाचे नेते आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू म्हणून देखील ते ओळखले जातात.
पक्षनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण कामाच्या जोरावर ही जबाबदारी मिळाल्याची भावना राज राजापूरकर यांनी व्यक्त केली.
या नियुक्तीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी त्यांचे स्वागत केले असून, राष्ट्रीय कार्याध्यक्षा संसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे व प्रभारी जितेंद्र आव्हाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सकारात्मक बदल घडतील असा विश्वास व्यक्त केला.
या नियुक्तीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ज्येष्ठ नेते प्रवीण भोसले,नंदूशेठ घाटे, सुरेश दळवी,जिल्हा बँक संचालक विक्टर डान्टस, प्रसाद रेगे, अनंत पिळणकर, समीर आचरेकर, रुपेश जाधव, सोशल मीडिया कोकण विभागीय अध्यक्ष प्रा. सचिन पाटकर, युवक अध्यक्ष विशाल जाधव विद्यार्थी सेल अध्यक्ष प्रतीक सावंत, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष बाबा खतीब,अल्पसंख्यांक सेल कार्याध्यक्ष नजीर शेख,ओबीसी नेते बाळ कनयाळकर, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, डॉ.संजीव लिंगवत,डॉ.विश्वास साठे,नितीन कुबल,उत्तम सराफदार साबा पाटकर महिला प्रदेश उपाध्यक्ष नम्रता कुबल, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

🎉 राज राजापूरकर साहेब यांना मनःपूर्वक शुभेच्छा..!

प्रतिक्रिया व्यक्त करा