*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
🌹🌹जीवनामृत🌹🌹
मनी नवे जीवनगीत स्फुरले
ओठांवरती शब्द थिरकले
भाव बोलके नयनी उतरले
जगण्याचे सारेअर्थ उमगले .
व्यर्थ कां दुःख कुरवाळिले
अश्रुंनि कां मना भिजविले
सुख तेथेचि होते जे क्षण
जीवनसार्थकी झिजून जगले.
सुख दुःख मेळ घालीतबसले
जीवनगाणे हरवुनि शोधित बसले
आयुष्याच्या वाटेवरती हे क्षण
येती सर्वांसाठी हे सत्य उमगले.
आता प्राक्तने जे आहे लिहिले
स्वीकार रे मना तू जे साहियले
सौख्य वाट सर्वां जीवनक्षण जे
आहेत आता तुझेच उरलेसुरले.
आनंदगीत सर्वांसाठी स्फुरले
किल्मिषे मनातील गाळून उरले
समाधानाचे तृप्तअमृत पाझरले
हर्षसुगंध दाहीदिशांना परिमळले.
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
मुंबई विरार
