You are currently viewing “गोफ रंगला”

“गोफ रंगला”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”गोफ रंगला”* 

 

शब्द रंग सुरांचा गोफ रंगला छान

मनुष्याचे जीवन होते समृद्ध सृजनIIधृII

 

कुंचल्याच्या जादूगारांचे रंग अदभूत

मराठी भाषाप्रभूंचे शब्द अगणित

बहु रंगी गोफरंग बनतो कलात्मकतेनंII1II

 

रंगात रंगून जातो देहभान विसरून

बोटांमधून उमटतो हुंकार चित्रांतून

कला नाट्य संगीत संस्कृतीने मिळे आनंदII2II

 

सुमन सांकूर गंध रंगांची होई उधळण

सृष्टी हिरवा शालू शृंगार करी परिधान

इंद्रधनु कवींना कलावंतास स्फूर्ती देतII3II

 

प्रमाण भाव लावण्य वर्णिकाभंग रूप

चित्रकर्मी शिल्पी रंगाजीव छबीकार ज्ञात

चित्रकार चितारती बहु रंग भावदर्शनII4II

 

प्रत्येक रंगाला आहे स्वभाव छटा जात

रंगांचा जादूगार ईश्वर निर्मितो सुगंध

अवघा रंग एक बने रंगी रंगला अनंतII5II

 

गोफ विणताना फिरकीने विसरते भान

सर्व जन उधळती रंग नुरे भेदाभेद

बासुरीचे सुरांनी कृष्णाचे घडते दर्शनII6II

 

©️कवी.श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा