You are currently viewing प्रेम वहातसे भरून दुथडी
Oplus_16908288

प्रेम वहातसे भरून दुथडी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*प्रेम वहातसे भरून दुथडी*

 

प्रसाद हाती शिवरायांचा

मिळाले लाल गुलाब फूल

प्रणाम असो विनायकाला

चतुर्थीला बांधतो मैत्री पूल……1

सकाळी होऊन सुचीर्भूत

उपस्थित झाली देवळात

घेऊन प्रेरणा राज्यांकडून

बक्षिस जिंकले *शर्यतीत*…2

सदैव मिळते *उर्जा येथे*

मनात येतात नवे विचार

ठरतात कारण बक्षिसाला

शब्दांना येते वेगळीच धार…3

होती चितपट स्पर्धक सारे

एकेक विषय स्वर्गीय तारे

असो समोर कुणीही वृध्द

नयना मध्ये *अश्रू तरारे*….4

मिळते शांती दर्शनात येथे

असावी लागते श्रद्धा थोडी

भरून जाते पात्र हातातील

प्रेम वहातसे भरून दुथडी…5

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा