*कणकवली शिवसेना शाखेत ०६ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती होणार साजरी*
*शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन*
कणकवली
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथील शिवसेना शाखेत शुक्रवार दि. ०६ मार्च २०२६ रोजी शिवजयंती ( तिथीप्रमाणे) साजरी करण्यात येणार आहे. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी ०९ वाजता श्री. सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. तरी याप्रसंगी कणकवली तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना कणकवली तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.
