झोळंबे गावात परंपरेचा जागर; गावहोळी उत्सव उत्साहात साजरा
झोळंबे :
परंपरा जपणारा गावहोळी उत्सव यंदाही गावात मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात गावच्या चव्हाट्यावर उभी राहिलेली गावहोळी ही केवळ धार्मिक विधी नसून पूर्वजांच्या आशीर्वादांची आणि गावाच्या एकतेची साक्ष ठरली.
ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने विधी पार पाडत गावाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. बदलत्या काळातही झोळंबे गावाने आपली संस्कृती, मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी जपून ठेवली असल्याचे या उत्सवातून पुन्हा अधोरेखित झाले.
उत्सवात ज्येष्ठांसह तरुण पिढीचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. गावहोळीच्या निमित्ताने ग्रामस्थ एकत्र येत परंपरेचे जतन करण्याचा निर्धार व्यक्त करतात, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
© ओमप्रसाद संदिप गवस
