You are currently viewing लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघ पुणेचा ४० वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न

लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघ पुणेचा ४० वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न

पुणे : रविवार, दि. १ मार्च लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघ पुणे चाळीसावा वर्धापन दिन सोहळा धर्मवीर संभाजी विद्यालय सभागृह, शास्त्री रोड, पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बहि:शाल व्याख्याते , साहित्यिक , भावकवी श्री. वि. ग. सातपुते हे अध्यक्ष म्हणून तसेच मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटनेचे (अस्कोप) अध्यक्ष श्री. दिलीप पवार, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य श्री. रामभाऊ कुलकर्णी यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. सदस्या श्रीमती पुष्पा भगत यांनी आपल्या सुमधुर आवाजात ईशस्तवन सादर केले.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित श्री. वि. ग. सातपुते, श्री. दिलीप पवार, लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. बंडोपंत फडके, कार्याध्यक्ष श्री. शरद महाबळ, सचिव श्रीमती वीणा कुलकर्णी व कोषाध्यक्ष श्री. राजेंद्र मुथा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.

संस्थेची गेल्या ४० वर्षाची वाटचाल संस्थेचे अध्यक्ष श्री. बंडोपंत फडके यांनी सविस्तरपणे मांडली. संस्थेच्या या वर्षीच्या कार्याचा अहवाल श्रीमती वीणा कुलकर्णी यांनी सादर केला, त्याला टाळ्यांच्या गजरात सभासदांकडून दाद देण्यात आली. दरवर्षी संस्थेतर्फे तीन पुरस्कार देण्यात येतात. या वर्षीचे मानकरी, ज्येष्ठ श्रेष्ठ पुरस्कार* श्री श्रीनिवास बर्वे यांस, ज्येष्ठ नागरिक पुरस्कार श्रीमती अनुराधा गोखले यांना व समाजाभिमुख कार्य करणाऱ्या श्रीमती पुष्पाताई नडे यांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या मानपत्रांचे वाचन श्री. नागेश कुलकर्णी, श्रीमती प्रभा भालेराव व श्रीमती सुचेता घाणेकर यांनी केले. संस्थेचे सभासद श्री. राजीव शास्त्री यांच्या संपर्कात आलेल्या पर्यावरणप्रेमी, श्री. प्रकाश ढगे यांनी झाडे लावा झाडे जगवा या ध्येयाने प्रेरित होऊन मोठे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची योग्य दखल घेऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

संस्थेच्या सभासदांमध्ये ज्या सभासदांनी या वर्षी आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत अशा सभासदांचे औक्षण करून त्यांच्या दीर्घायुष्यसाठी प्रार्थना केली व त्यांचाही सत्कार केला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. दिलीप पवार यांचा परिचय श्रीमती स्मिता ब्रह्मे व अध्यक्ष श्री. वि. ग. सातपुते यांचा परिचय श्री. दत्तात्रेय कुलकर्णी यांनी करून दिला.

श्री. दिलीप पवार व श्री. वि. ग. सातपुते यांनी आपले विचार मांडून जमलेल्या श्रोतृवर्गास उद्बोधन केले.

या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराचे अध्यक्ष श्री. माननिय धिरज घाटे, तसेच नवनिर्वाचित नगरसेवक श्री. अमर आवळे व माजी नगरसेविका श्रीमती ‍मनिषाताई घाटे आवर्जून उपस्थित होते.

या सर्वांनीआमच्या कार्याची योग्य ती दखल घेऊन सर्व सहकार्याचे आश्वासन दिले. ज्ञानप्रबोधिनीच्या संवादिनी गटाने मनोवेध या कार्यक्रमाचे सादरीकरण केले या कार्यक्रमातील क्षणचित्रे टिपण्याचे काम आमच्या सभासद श्रीमती मालाताई खानापुरक यांनी उत्तम केले. श्री. शरद महाबळ यांनी आपल्या खुमासदार शैलीत सर्वसमावेशक असे आभार प्रदर्शन केले व त्यानंतर सौ. वैशाली फडके यांच्या अतिशय सुरेल वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा