You are currently viewing पदर

पदर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पदर*

 

चेहरा पुसते पदराने

पदराने घालते वारा

पदर पांघरता आईचा

शीणभाग जातो सारा…!!

 

विहिणीच्या पदरात

पोटची लेक घालते

तुकडा आईच्या काळजाचा

भरलेले डोळे पुसते….!!

 

नको खेळू पदराशी

लाजून होतेस चूर

ये ना जवळ सखे

राहू नकोस अशी दूर….!!

 

वा-याने उडता पदर

कशीबशी सावरते

बट कुरळ्या केसांची

गालावर रुळते….!!

 

पोषाखात नसेल पदर

पण विचारात आहे

जपायचा कसोशीने

हाच तर प्रघात आहे…..!!

 

लज्जारक्षणार्थ पदर

संकटात खोचून पदर

बाळाला मायेचा पदर

पदराचेही अनेक *पदर…*. !!

०००००००००००००००००

*अरुणा दुद्दलवार🙏✍️*

प्रतिक्रिया व्यक्त करा