*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रंगोत्सव*
सरता शिशिर दिस मोठा होईल,
तांबडं फूटता पूर्वा गुलाल ऊधळील,
रथातील रवीराज धरा सोनेरी करील,
अंबरात कापूसमेघ विहरतील.
राने वने चैत्रपालवीत पोपटी होतील,
जाई जुई मोगरा शुभ्र वसनी नटतील,
गुलाबी काटेसावर हळूच लाजेल,
लाल पांगारा अग्नी होईल,
अनेक रंगात रानी वनी फूलोरे बहरतील,
आंब्यावर बाळकैरी हिरवे तोरण बांधेल,
फणस जांब पपया जांभळे,
आपल्या रंगात रंगुनी घेतील हिंदोळे,
वृंदावनी घननीळ होळी खेळेल,
भिजूनी राधा प्रेमरंगात रंगेल,
पिवळ्या मुंडावळी बांधून ग्रिष्माचा बहावा येईल,
सोनचाफा आंबा अबोली,
पिवळ्यारंगात ऋतूराजाची पालखी येईल
सजलेली चैत्रगौर चैत्रांगणी खेळेल,
रंगोत्सव वसंताचा भूमीवर रंगेल.
अनुराधा जोशी.
9820023605
