*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नका छाटू मला .. मी..*
नका छाटू मला मी आहे भला
नका छाटू मला मी आहे भला..
मी देतो तुम्हाला हो छाया
मी करतो तुम्हावर माया
मी फुलतो नि देतो फळे
मिळे सावली ती माझ्यामुळे
माझ्या अंगी हो नाना कला..
नका छाटू मला मी आहे भला..
मी धरून ठेवतो पाणी
सावलीत ती माझ्या हो गाणी
किती देतो फळे पहा गोड
तरी करती का हो माझी तोड
झुला झुलवितो तुमच्याच मुला
नका छाटू मला मी आहे भला..
मी लदबदतो हो फळभारे
आणि बांधतो तुमची ती घरे
मी नित्यच देतो हो छाया
किती करतो मी तुम्हावर माया
किती अंगी हो त्या नानाकला
नका छाटू मी आहे भला…
किती सावली माझी हो गोड
आणि आंब्याची रसदार फोड
फळभाराने लदबदतो मी
तुम्हा लागतो फार मी गोड
तरी कुऱ्हाडीचा का हो घाला
नका छाटू मी आहे भला…
किती उपकार तरी ही हो माझे
होळी करताच अंग हो भाजे
चटचटा ते पोळते अंग
रंग खेळण्यात तुम्ही हो दंग
तुम्ही बघण्यात दंग हो ज्वाला
नका जाळू मी आहे भला..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
