You are currently viewing “मराठी भाषा गौरव दिन” संपन्न

“मराठी भाषा गौरव दिन” संपन्न

“मराठी भाषा गौरव दिन” संपन्न

सिंधुदुर्गनगरी

ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज  यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्याचाच एक भाग म्हणून व आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिन  “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.

या दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, लेखाधिकारी विलास आरोंदेकर, अव्वल कारकून तृप्ती उबाळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन २७ फेब्रुवारी २०२६ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत कार्यालयीन वेळेत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे करण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच वाचक सभासदांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा