You are currently viewing बोर्डवे रेल्वे स्थानकासाठी आमरण उपोषण; रेल रोकोचा इशारा

बोर्डवे रेल्वे स्थानकासाठी आमरण उपोषण; रेल रोकोचा इशारा

बोर्डवे रेल्वे स्थानकासाठी आमरण उपोषण; रेल रोकोचा इशारा

उपोषणस्थळी संदेश पारकर यांची भेट

कणकवली :

बोर्डवे येथे प्रस्तावित रेल्वे स्थानकाला तातडीने मंजुरी द्यावी या मागणीसाठी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास रेल रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
बोर्डवे रेल्वे फाटक परिसरात सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व चंद्रहास राणे करत आहेत. ‘बोर्डवे रेल्वे स्टेशन दशक्रोशी संघर्ष समिती’च्या वतीने हे आंदोलन उभारण्यात आले असून, स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांची मागणी शासनाने लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी भूमिका समितीने स्पष्ट केली आहे.

दरम्यान, उपोषणस्थळी संदेश पारकर यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला. तसेच विलास परब, जगन्नाथ राणे, प्रमोद कावले, महादेव राठवड, मोहन येनडे आदी मान्यवरांनीही उपस्थित राहून आपला पाठिंबा व्यक्त केला. परिसरात शांततेत आंदोलन सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा