You are currently viewing मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेला शुभेच्छा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेला शुभेच्छा

१ मार्चपासून एम-टू-एम रो-पॅक्स सेवा प्रवाशांच्या सेवेत; ६–७ तासांत मुंबई–विजयदुर्ग प्रवास शक्य

मंत्री नितेश राणे यांच्या ट्विटला मुख्यमंत्र्यांचे रि-ट्विट; प्रकल्पाच्या महत्त्वावर अधोरेखित

 

मुंबई :

मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) अशी १ मार्चपासून सुरू होणाऱ्या एम-टू-एम रो-पॅक्स (रो-रो) जलवाहतूक सेवेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्री नितेश राणे यांच्या ट्विटला रि ट्विट करत जलसेवेच्या शुभारंभाला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे,“मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) दरम्यान रो-पॅक्स फेरी सेवा १ मार्च २०२६ पासून सुरू होत आहे. यामुळे कोकणवासियांना सागरी मार्गाने जलद, आरामदायी व आनंददायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या सेवेद्वारे अवघ्या ६ ते ७ तासांत मुंबईहून विजयदुर्ग येथे पोहोचता येणार आहे.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) दरम्यानची बहुप्रतिक्षित एम-टू-एम (रो-पॅक्स) रो-रो जलवाहतूक सेवा दिनांक १ मार्च २०२६ पासून अधिकृतपणे प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने सुरू करण्यात येत असलेली ही सेवा कोकण आणि मुंबई दरम्यानच्या सागरी दळणवळणाच्या दृष्टीने ऐतिहासिक टप्पा मानली जात आहे.

दरम्यान, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री.नितेश राणे यांनी या सेवेबाबतची माहिती त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (Twitter) हँडलवरून शेअर केली होती. त्यांच्या या ट्विटची दखल घेत मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी ते ट्विट रीपोस्ट करत या प्रकल्पाचे स्वागत केले आहे. आणि मंत्री नितेश राणे यांच्या कामाला प्रोत्साहन दिले.मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रिये मुळे या प्रकल्पाचे राज्याच्या विकासात्मक दृष्टीन आणि सेवेचे असलेले महत्त्व अधोरेखित झाले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा