You are currently viewing अभिमान मराठी भाषेचा

अभिमान मराठी भाषेचा

*ज्येष्ठ साहित्यिक श्री.लक्ष्मण कुशा पाटकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अभिमान मराठी भाषेचा*

 

काय सांगू माझ्या मराठीची महती..

अखिल विश्व तिचा गजर गाती….

 

विविधतेने मराठी माझी नटलेली ..

रमणी भरजरी वस्त्रे ल्यायलेली…

शलिनतेचा शालू नेसून..

सोज्वळता अंगिकारलेली..

 

गोड,रसाळ माझी मराठी माऊली…

जशी चंदनाची शितल सावली…

 

मराठी शब्दांनी समृद्ध..

कधिही होणार नाही वृद्ध..

नवनिर्मिती हेच असे तिचे ध्येय…

जसं क्लिओपात्राचं सौंदर्य…

 

अमृताची गोडी असे माझ्या भाषेला…

तिनेच तारले आपल्या देशाला…

 

हिमालयाच्या मदतीला..

मराठी सह्याद्री धावला..

त्यानेच जेव्हां दिला मंगल कलश संयुक्त महाराष्ट्राचा..

समस्त मराठीजनांचा कंठ दाटून आला..

 

मराठी भाषेला अखेर न्याय मिळाला.

अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला..

मी मराठी असल्याचा..

अभिमान आहे मला..

अभिमान आहे मला..!!

 

*मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*🌹🌹

 

कवी-श्री.लक्ष्मण कुशा पाटकर..

प्रतिक्रिया व्यक्त करा