You are currently viewing शिवजयंती निमित्त मालवण येथे दिव्यांग बांधवांचा आनंद मेळावा मोठ्या जल्लोषात साजरा

शिवजयंती निमित्त मालवण येथे दिव्यांग बांधवांचा आनंद मेळावा मोठ्या जल्लोषात साजरा

*शिवजयंती निमित्त मालवण येथे दिव्यांग बांधवांचा आनंद मेळावा मोठ्या जल्लोषात साजरा*

सिंधुदुर्ग

नाद पैसेवांगण सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल राष्ट्रीय दृष्टीने महासंघ विभागीय शाखा कोकण यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजयंतीचे औचित्य साधून दिनांक 18 व 19 2026 रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाथ पै यांच्या वतीने आनंद मिळावा घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी मान्यवर म्हणून नाथ पै सेवांगणचे प्रशासकीय अधिकारी माननीय आचरेकर व पदाधिकारी राष्ट्रीय महासंघ विभागीय शाखा कोकणचे अध्यक्ष श्री बाबुराव गावडे सर साईकृपा संस्थेचे अध्यक्ष माननीय अनिल शिंगाडे सर शामसुंदर लोट सर सुनील तांबे सर रंजना इंदुलकर सर श्याम आजगावकर सर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला चाळीस हुन जास्त दिव्यांग उपस्थित होते. कार्य क्रमाला दिव्यांग बांधवांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये बास्केटबॉल,संगीत खुर्ची,प्रश्नमंजुषा अंताक्षरी अशा विविध स्पर्धा घेऊन आनंद घेण्यात आला.त्यानंतर राजकोट येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भेट देण्यात आली. नंतर मालवण गार्डन येथे जाऊन आनंद लुटला नाथ पै सेवांगणाच्या वतीने सर्व दिव्यांग बांधवांना निवासाची नाश्ता व जेवण यांची व्यवस्था करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन नाथ पै सेवांगण यांनी केले होते माननीय श्री.आचरेकर सरांनी उपस्थित आमचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली व दरवर्षी असेच कार्यक्रम करूया व आनंद लुटूया असे अत्रेकर सर यांनी सांगितले त्याबद्दल सर्व दिव्यांग बांधवांनी आचरेकर सरांचे आभार मानले व असेच आम्हाला सहकार्य करत राहा आमच्या पाठीशी उभे रहा असे सांगितले

प्रतिक्रिया व्यक्त करा