*🚩 निवती किल्ल्यावर शिव जन्मोत्सव साजरा*
वेंगुर्ले
प्रतिवर्षी संवर्धन करत असलेल्या किल्ल्यावरच दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, भारत मार्फत शिव जन्मोत्सव सोहळा साजरा केला जात असतो. यावर्षी निवती किल्ल्यावर सदर सोहळा साजरा करण्यात आला.
शिव जन्मोत्सवाची सुरुवात सुशिला नांदोस्कर यांच्या हस्ते मूर्ती पूजनाने करण्यात आली. अमित मार्गी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. गणेश नाईक यांच्या प्रस्ताविकानंतर सुरेश मार्गी, रणवीर गावडे, सिंधु कदम या छोट्या मावळ्यांनी पोवाडे सादर केले. उपस्थित सदस्यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी यावर्षीचा दुर्ग मावळा रत्न पुरस्कार देवगड तालुकाध्यक्षा हेमलता जाधव मॅडम यांना प्रदान करण्यात आला. निवती संवर्धनात मोलाची कामगिरी करणाऱ्या यतिन सावंत याचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वप्निल साळसकर यांची वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमास तीस मावळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमांगी जोशी तर आभार समिल नाईक यांनी मानले.
