You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराज..जाणता राजा

छत्रपती शिवाजी महाराज..जाणता राजा

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*छत्रपती शिवाजी महाराज..जाणता राजा*

 

मातीच्या कुशीत जन्मला स्वराज्याचा विचार,

रयतेच्या डोळ्यांत पेटला स्वाभिमानाचा शृंगार..

 

तलवारीपेक्षा तेजस्वी होती न्यायाची धार,

जाणता राजा ठरला, जनतेचा खरा आधार..

 

किल्ले किल्ले बोलू लागले शौर्याची गाथा,

डोंगरदऱ्यांत घुमला पवित्र नाद स्वातंत्र्याचा..

 

शत्रूही नतमस्तक झाला पाहून त्याची वाटा,

मराठी मातीला मिळाला साज स्वाभिमानाचा..

 

धर्मनिरपेक्षतेचा दीप हाती घेऊन चालला,

सर्वधर्म समभावाचा मंत्र जनतेला दिला..

 

स्त्रीसन्मानाचा आदर्श जगाला शिकवला,

म्हणून इतिहासाने त्याला आदराने वंदिला..

 

रणनितीची बुद्धी, करुणेची होती साथ,

शत्रूवरही न्याय, मित्रांवर मायेचा हात..

 

राजा असूनही रयतेशी ठेवली समता नात,

म्हणून जनतेच्या हृदयात कोरली त्याची बात..

 

स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नव्हे सिंहासन,

ते जनतेच्या सुखदुःखाशी बांधलेले बंधन..

 

मूल्यांच्या पायावर उभे राहिले शासन,

म्हणून अमर झाले शिवरायांचे आसन..

 

काळाच्या पडद्याआड गेले तरी तेज अपार,

शिवजयंतीला उजळती मनामनांत विचार..

 

मराठी श्वासात आजही धडधडतो तो संस्कार,

जाणता राजा शिवराय युगायुगांचा आधार..

 

 

सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा