You are currently viewing शांताराम काणेकर स्मरणार्थ चित्रस्पर्धेला घारपी शाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद

शांताराम काणेकर स्मरणार्थ चित्रस्पर्धेला घारपी शाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद

*शांताराम काणेकर स्मरणार्थ चित्रस्पर्धेला घारपी शाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद*

*बांदा*

कै. शांताराम गजानन काणेकर (माजी ग्रामसेवक) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच सनी शांताराम काणेकर (रा. बांदा) यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे शिवजयंतीनिमित्त भव्य चित्र रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण शाळा परिसर शिवभक्तीच्या उत्साहाने आणि रंगांच्या उधळणीने भारावून गेला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी देखणे चित्र रंगांच्या माध्यमातून साकारले. प्रत्येक चित्रातून शिवप्रेम, धैर्य आणि स्वाभिमानाची झलक पाहायला मिळाली.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, रंगांची अचूक निवड आणि बारकावे टिपण्याची क्षमता यामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली. शिक्षकांनी शिवचरित्राची प्रेरणादायी माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यामुळे उपक्रमाला केवळ स्पर्धेचे नव्हे तर संस्कार व ज्ञानाचे स्वरूप प्राप्त झाले. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे गट पहिली ते दुसरी-प्रथम -किर्ती गावकर,द्वितीय – मानस नाईक तृतीय -यज्ञा कविटकर,श्रेया असनोडकर गट तिसरी ते चौथी प्रथम -स्वप्नील गावडे द्वितीय -गार्गी गावडे,तृतीय-रूची नाईक,रूद्र सावंत, समर्थ कविटकर, गट पाचवी ते सातवी -प्रथम -स्वप्नाली गावडे, द्वितीय -बळीराम गावडे ,वैष्णवी गावडे,राज गावडे, तृतीय -भिकाजी नाईक, बाबाजी कविटकर, यशस्वी सावंत,इशिका असनोडकर, सिद्धी कविटकर
या उपक्रमासाठी सनी शांताराम काणेकर यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक जे.डी.पाटील व सहकारी शिक्षक मुरलीधर उमरे, आशिष तांदुळे धर्मराज खंडागळे यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा