*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रीत वेल*
प्रीत वेल बहरली
तुला समोर पाहूनी
मन माझे मोहरले
प्रीत नयनी वाहूनी
तुझ्या मिठीत सजना
रोम रोम बहरले
आला बहार मनात
प्रीत भाव बहरले
वसलेली तुझ्या रंगी
मुर्ती तुझी अंतरात
ध्यानी मनी चित्र तुझे
विहारतो तू मनात
ओढ तुझी मला छळे
स्पर्श गंध हवा हवा
पाहू दे तुझ्या सोबती
जीवनात सूर नवा
कळी उमलली कशी
मन होई आज धुंद
सांजेला परिमळ हा
सुवास मधूर मंद
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी कर्नाटक
