*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मनोबोध दासांचा ।।*
————————————————-
जय जय रघुवीर समर्थ
मंत्र जणू हा मना तारणारा
मना अखंड जागृत करणारा
मनावरती अंकुश ठेवणारा ।।
मनात चालते सदा गडबड
हव्यासापोटी सारा धडपडा
स्थिरता लाभावी चंचल मना
न्यावे मनास सज्जनगडा ।।
श्री दासबोध, मनाचे श्लोक,
गोडी नव्या पिढीला लागावी
उक्ती-कृतीची सुमती हो द्यावी
अक्षर- सेवा नित्य घडावी ।।
माघ वद्य नवमी -तिथी ही
समर्थांचा आहे समाधीदिन
अरूणदास काव्य सुमने करी
समर्थ रामदासा चरणी अर्पण ।।
*****
जय जय रघुवीर समर्थ ।।
———————————————–
कवी -अरुणदास “- अरुण वि.देशपांडे
9850177342
————————————————
