You are currently viewing पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सहसचिव म्हणून श्री.गजानन ढमाले यांची निवड

पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सहसचिव म्हणून श्री.गजानन ढमाले यांची निवड

पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सहसचिव म्हणून श्री.गजानन ढमाले यांची निवड

काळेवाडी, चिंचवड (13 फेब्रुवारी 2026 )

ज्येष्ठ नागरिक महासंघ पिंपरी चिंचवड शहर नवीन कार्यकारिणी 2026 ते 2028 यांचा पदग्रहण शपथविधी निवडणूक प्रमाणपत्र कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी 28 प्रतिनिधींनी शपथ घेतली.
ज्योतिबा मंगल कार्यालय काळेवाडी येथे सकाळी दहा वाजता हा शपथविधी कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड शहर जेष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती वृषाली ताई मरळ परिवारातर्फे करण्यात आले.
यमुना नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजानन ढमाले यांचा सहसचिव पदी बहुमताने निवड झाल्याबद्दल शपथविधीनंतर शाल, श्रीफळ, महासंघाचे आय कार्ड व बहुमताने सहसचिव या पदावर बहुमताने यथोचित रित्त्या निवड झालेली आहे ,याचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघ यमुनानगर सदस्यांनी याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा