You are currently viewing श्रीकांत सावंत यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या घेतल्या गाठीभेटी

श्रीकांत सावंत यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या घेतल्या गाठीभेटी

सिंधुदुर्गच्या विविध विकासात्मक प्रश्नांबाबत आग्रही मागण्या..

मसुरे :

मानवता विकास परिषद अध्यक्ष, रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समिती कार्यवाह श्रीकांत सावंत यांचा ६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण- कणकवली दौरा संपन्न झाला. या दरम्यान श्रीकांत सावंत यांनी मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीतल्या आंगणे कुटुंबियांच्या श्री देवी भराडी मातेच्या वार्षिकोत्सवाला भेट दिली. त्यांनी श्री. देवी भराडी मातेचे दर्शन घेतले व उपस्थितांशी भेटी घेत चर्चा केली. श्रीकांत सावंत यांनी या दौर्यात राजकीय नेत्यांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी घेत चर्चा केली.

त्यांनी मालवण येथे नगरपरिषद निवडणुकीतील विजयाबद्दल नगरसेवक मंदार केणी यांची भेट घेत अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. वेरली सरपंच धनंजय परब यांचेही त्यांनी अभिनंदन केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकांमधल्या विजयाबद्दल श्रीकांत सावंत यांनी क्षमा हडकर आणि पंचायत समिती सदस्य म्हणून छोटू ठाकूर यांचा शाल देऊन सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत समीर प्रभुगावकर व संदीप हडकर, पुरुषोत्तम शिंगरे उपस्थित होते. यावेळी मसुरे जिल्हा परिषद मतदार संघातील विविध विकासात्मक प्रश्न उपस्थित करून याबाबत सभागृहामध्ये आवाज उठविण्याचे आवाहन श्रीकांत सावंत यांनी केले.

ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी सौ. शर्मिला पिंपळोलकर यांची निवड झाल्याबद्दल देखिल श्रीकांत सावंत यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचाही सत्कार केला. दरम्यान, श्रीकांत सावंत यांनी वरीष्ठ वकिल श्री. समीर गवाणकर व मसुरे येथे डाॅ. अनिरुद्ध मेहेंदळे, हाॅटेल व्यावसायिक संजय गावडे, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, मालवण नगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य यांचीही सदिच्छा भेट घेतली.

श्रीकांत सावंत यांनी या दौर्यातील गाठी भेटी अत्यंत सकारात्मक होत्या असे सांगितले आणि समाजाला मानवता, धर्म आणि राष्ट्र यांच्या प्रती जागृतीसाठी राष्ट्रसंत परमपूज्य पाचलेगांवकर महाराजांना अभिप्रेत कार्य करत रहायचा आग्रह सुरू ठेवायचे आवाहन केले. सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी यावेळी विविध विषयावर संबंधितांची चर्चा विनिमय करण्यात आला.

यावेळी श्रीकांत सावंत यांनी भेट घेतलेल्या विविध मान्यवरांना राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराजांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त त्यांना समर्पित तसेच श्रीकांत सावंत मुख्य संपादक असलेला संचारेश्वर विशेषांक सदिच्छा भेट स्वरुपात दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा