*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*🌼 शिवपूजन🌼*
महाशिवरात्री दिनी, नमावे शिवाला
सुप्रभाती दर्शन होता, शांती मनाला,
प्रसन्न होती करुणाकर, शिवशंकर
श्रद्धेने करा मंत्र जप, अर्थ जीवनाला.
🌼
जल,गोदुग्धाभिषेक करा पवित्रतन्मने
अखंडअक्षता,बिल्वत्रिदलेअखंडपुष्पे,
पंचामृत,नैवेद्यात पंचफले,दुग्धमिठाई
नागकेसर,धोत्रा,कणेर,शुभ्रकमलपुष्पे
🌼🌼
हे प्रभो, शिवशंभोतूप्रसन्नहोभक्तांवरी
नाम राहो सदा तुझे दयाळा ममअंतरी
भोळासांबसदाशिव,महादेवशिवशंकर
सोळासोमवार व्रतस्थांस साथनिरंतरी
🌼🌼🌼
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शीघ्रस्वरचना
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
कला शिक्षिका.
