You are currently viewing सावंतवाडी येथे निशुल्क समग्र योगसाधना शिबीर (Integrated Yoga Camp) आयोजन.

सावंतवाडी येथे निशुल्क समग्र योगसाधना शिबीर (Integrated Yoga Camp) आयोजन.

सावंतवाडी येथे निशुल्क समग्र योगसाधना शिबीर (Integrated Yoga Camp) आयोजन.

सावंतवाडी

पतंजली योग समिती, सावंतवाडी आणि सावंतवाडी वैश्य समाज यांच्यावतीने सावंतवाडीत शनिवार १४ ते बुधवार १९ फेब्रुवारी दरम्यान निःशुल्क निशुल्क समग्र योगसाधना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी पतंजली योग समितीच्या स्थायी योग वर्गाला १८ फेब्रुवारी रोजी वीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सावंतवाडी गवळी तिठा येथील वैश्यभवन येथे सकाळी ५:३० ते ७ या वेळेत हे शिबीर होणार आहे.
या शिबिरात सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासने, ऍडव्हान्स योग, आयुर्वेद तसेच योगोपचार आणि आध्यात्मिक उन्नती बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच या शिबिरात रोगमुक्त, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, ताणतणाव मुक्तता, पचनक्रिया, तसेच वजन नियंत्रण, मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठीही विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच शारीरिक आरोग्य, मानसिक एकाग्रता आणि आध्यात्मिक संतुलनासाठी योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचा एकत्रित सराव करून घेण्यासाठी हे शिबीर आयोजित केले आहे. त्याचप्रमाणे तणावमुक्ती, लवचिकता आणि जीवनशैली सुधारण्यासाठी हे शिबीर उपयुक्त आहे, ज्यामध्ये सहसा आसन, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि ध्यानधारणा यांचा समावेश आहे.
तारीख या शिबिराचा योगाभ्यासप्रेमी पुरुष, महिलांनी लाभ घ्यावा. तसेच या शिबिराच्या अधिक माहितीसह नाव नोंदणीसाठी वैश्यसमाज सावंतवाडीचे श्री बोन्द्रे सर, सावंतवाडी पतंजली योग समितीचे समन्वयक विकास गोवेकर (९४२११४८७३७), जिल्हा सहप्रभारी दत्तात्रय निखार्गे (९४२०३०६८६९) तसेच पतंजली योग समितीचे सावंतवाडी तालुका प्रभारी बाबली गवंडे (8390905269) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पतंजली योग समिती सावंतवाडी व वैश्यसमाज सावंतवाडी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा