सामाजिक क्षेत्रात संपूर्ण भारतात विनामूल्य काम करणाऱ्या व फक्त एक रुपयांमध्ये आयएएसचे प्रशिक्षण देणाऱ्या अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएसने आयोजित केलेल्या शिवजयंती उपक्रमाला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मिशन आयएएसने पुण्याचे सुप्रसिद्ध वक्ते व अमरावतीचे सुपुत्र डॉ. प्रवीण कुमार शेंडे यांना निमंत्रित केले आहे. त्यांची व्याख्याने वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करून मिशन आयएएसने एक नवा विक्रम स्थापन केला आहे. आतापर्यंत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय तंत्रनिकेतन शासकीय जवाहर नवोदय विद्यालय लोकमान्य विद्यालय चाणक्य फाउंडेशन या ठिकाणी डॉ. प्रवीणकुमार शेंडे यांनी व्याख्याने घेतली असून पुढील 28 फेब्रुवारी पर्यंतची त्यांची सर्व व्याख्याने अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक शिवजयंती मंडळ व संस्थांनी आयोजित केली आहेत.
नागपूर जिल्ह्यातील कारंजा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी व पत्रकारांनी श्री विलास वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेऊन त्या परिसरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी एकंदर नऊ कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हा एक विक्रम आहे.
छत्रपती श्री शिवराय यांच्या जयंतीनिमित्त मिशन आयएएसने स्पर्धा परीक्षेची एबीसीडी हे पुस्तक तीन विभागात प्रकाशित करण्याचे ठरविले असून या तीनही पुस्तकांच्या प्रती स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्य वितरित करण्यात येतील. ही पुस्तके मराठी हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध राहतील. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके पोस्टाने पाठविण्यात येतील. ज्यांना ही पुस्तके पाहिजे आहेत त्यांनी पुस्तकाची नोंदणी 9890967003 या व्हाट्सअप क्रमांकावर स्वतःचा पत्ता पाठवून करावी. तसेच अमरावती शहरातील विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांना या पुस्तकांच्या प्रत्येकी पाच प्रति ग्रंथालयासाठी विनामूल्य देण्यात येतील.
मिशन आयएएस ही भारतातील प्रतिष्ठित संस्था असून या संस्थेला आतापर्यंत 373 सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन या उपक्रमाची पाठराखण केली आहे. संस्थेने यापूर्वी 73 पुस्तके प्रकाशित करून व ती विनामूल्य वितरित करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. याशिवाय संपूर्ण भारतात 18000 स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतलेल्या आहेत
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून ठिक ठिकाणच्या व्याख्यानांना उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कुठल्याही प्रकारचे मानधन किंवा प्रवासखर्च आकारण्यात येत नाही ही बाब वैशिष्ट्यपूर्ण आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी या उपक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती मिशन आयएएसचे संचालक व सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षातज्ञ प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
