You are currently viewing मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये मुलांसाठी आरोग्य व मानसिक स्वास्थ्यविषयक सत्राचे आयोजन

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये मुलांसाठी आरोग्य व मानसिक स्वास्थ्यविषयक सत्राचे आयोजन

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये मुलांसाठी आरोग्य व मानसिक स्वास्थ्यविषयक सत्राचे आयोजन

(व्यक्तिमत्व विकसित करणारे छंद जोपासा:- डॉ.राजशेखर कार्लेकर)

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीमध्ये इयत्ता सहावी ते आठवीच्या मुलांसाठी मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी मानसिक ,भावनिक व शारीरिक स्वास्थ्यविषयक मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले.
यावेळी डॉ. राजशेखर कार्लेकर (BAMS)यांनी कुमारवयातील शारीरिक बदल, मानसिक बदल, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम तसेच वाचन, लेखन, क्रीडा यासारखे व्यक्तिमत्व विकसित करणारे छंद जोपासण्याचे फायदे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. यावेळी मुलांच्या समस्यांचे निराकरण देखील करण्यात आले.
या कार्यक्रमाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा