सावंतवाडी नगरपरिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह;
शिव उद्यानातील खेळणी धोकादायक – देव्या सूर्याजी
सावंतवाडी
सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानमधील खेळणी धोकादायक बनली आहेत. घसरगुंड्या नादुरुस्त होत चालल्या असून नगरपरिषदेचे याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाल आहे. यामुळे लहान मुलांना धोका निर्माण झाल्याचा आरोप नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला आहे.
ते म्हणाले, घसरगुंडीच्या फायबरला तडे गेलेत. हे लागून लहान मुलांना इजा होण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेने यावर तातडीने कार्यवाही करण अपेक्षित आहे. याठिकाणी नवीन घसरगुंड्या बसविण्यात याव्यात अशी मागणी श्री. सुर्याजी यांनी केली. तसेच ओपन जीम मधील व्यायामाचे साहित्य खराब झाले आहे. येथे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व युवकांना मोडकळीस आलेल्या साहित्यांचा वापर करावा लागत आहे. १ महिन्यांपूर्वी लेखी पत्र नागरिकांनी देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. योजनेतून आलेल्या साहित्याची देखभाल राखण हे नगरपरिषद प्रशासनाच काम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर, याकडे तातडीने लक्ष देऊन योग्य मोडकळीस व नादुरुस्त असलेली खेळणी व व्यायाम चे साहित्य नवीन बसवण्याची कार्यवाही करावी असे नगरसेवक श्री. सुर्याजी यांनी सांगितले. उद्यानातील खेळणी व त्यापासून निर्माण झालेला लहान मुलांना धोका बघता ताताडीने त्यावर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी येथील उपस्थितांनी देखील केली आहे.
