You are currently viewing कोकीसरे रेल्वेगेट नुकसान प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता

कोकीसरे रेल्वेगेट नुकसान प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता

कोकीसरे रेल्वेगेट नुकसान प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता

ऍड. अशपाक शेख यांनी केला यशस्वी युक्तिवाद

ओरोस :

वैभववाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्रमांक ००५/२०१५ अन्वये दाखल कोकीसरे रेल्वेगेट नुकसान प्रकरणात ओरोस येथील मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी शैलेश रामचंद्र गावडे (वय ३०, रा. कोकीसरे, पालकरवाडी) यांची निर्दोष मुक्तता केली आहे. दिनांक १९ डिसेंबर २०१५ रोजी बोलेरो वाहनाने रेल्वेगेटच्या बूमला धडक देऊन नुकसान केल्याचा आरोप आरोपीवर ठेवण्यात आला होता.
या प्रकरणात खालच्या न्यायालयाने आरोपीस साध्या कारावासाची शिक्षा व नुकसानभरपाई ठोठावली होती. मात्र, सदर शिक्षेविरुद्ध आरोपीने दाखल केलेल्या अपिलात सरकारी पक्षाकडून आरोप पुरेशा प्रमाणात सिद्ध न झाल्याचे व साक्षीपुराव्यात विसंगती आढळून आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. आरोपीच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपीचे अपील मंजूर करून त्याची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात अॅड. नामदेव मठकर, अॅड. पंकज खरवडे, अॅड. विनय रजपूत व अॅड. कैस शेख यांनी सहाय्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा