You are currently viewing हरकुळ खुर्द पं.स. मतदारसंघात महायुतीचा दणदणीत विजय
Oplus_16908288

हरकुळ खुर्द पं.स. मतदारसंघात महायुतीचा दणदणीत विजय

चंद्रहास उर्फ बबलू सावंत १,१५४ मतांच्या फरकाने विजयी; विरोधकांना पराभव

कणकवली :

हरकुळ खुर्द पंचायत समिती मतदारसंघात भाजप–शिवसेना महायुतीचे उमेदवार चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पहिल्याच मतमोजणीत चंद्रहास सावंत यांना एकूण २,०१० मते मिळाली.

उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अविनाश सावंत यांना ८५६ मते, तर अपक्ष उमेदवार विद्याधर तांबे यांना ५७५ मते मिळाली. चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांनी १,१५४ मतांच्या स्पष्ट फरकाने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत पंचायत समिती सदस्यपदी विजय संपादन केला.

या निकालानंतर हरकुळ खुर्द परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा