सदानंद हळदिवे यांचा ६०२ मतांनी पराभव; अनंत पिळणकर तिसऱ्या क्रमांकावर
कणकवली :
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट जिल्हा परिषद गटाची निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरली. या मतदारसंघात भाजपचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार राजन बाळकृष्ण चिके यांनी आपले प्रतिस्पर्धी सदानंद गोविंद हळदिवे यांचा ६०२ मतांनी पराभव केला.
या निवडणुकीत राजन चिके यांना ४,१६२ मते, सदानंद हळदिवे यांना ३,५६० मते, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अनंत पिळणकर यांना ५३६ मते मिळाली असून ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
कणकवली तालुक्यात आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये फोंडाघाटचा हा निकाल धक्कादायक मानला जात आहे. राजन चिके यांच्या विजयानंतर समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करत आनंद साजरा केला.
