*वैभववाडी तालुक्यातील धनगरवस्त्यात 11 कोटी 23 लाखांची विकास कामे मार्गी*
खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मिळाला भरघोस निधी
वैभववाडी
वैभववाडी तालुक्यातील धनगर वस्त्यामध्ये माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून 11 कोटी 23 लाख रु. ची विकास कामे मार्गी लागली आहेत. गावातील प्रत्येक धनगरवाडी वस्तीवरील विकास निधी पोहचल्याने ग्रामस्थात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पूर्ण करण्यात आलेली कामे पुढीलप्रमाणे –
करुळ डोणावाडी येथे रस्ता तयार करणे – 4 कोटी 50 लाख, वायबोशी येथे समाज मंदिर बांधणे – 10 लाख, वायबोशी येथे प्राथमिक शाळा बांधणे – 12 लाख 50 हजार, वांयबोशी येथे जाणारा मुख्य रस्ता करणे – साडेतीन कोटी, नावळे स्मशानभूमी रस्ता तयार करणे – 4 लाख, नावळे धनगरवाडा स्ट्रीट लाईट करणे – 3 लाख, नावळे तामटीचा कणा येथे रस्ता करणे – 17 लाख, नावळे धनगरवाडा येथे विहीर बांधणे – 7 लाख 50 हजार, आचिर्णे धनगरवाडा येथे रस्ता तयार करणे – 50 लाख, आचिर्णे धनगरवाडा येथे स्ट्रीट लाईट बसविणे – 7 लाख, आचिर्णे धनगरवाडा येथे लाईट पोल बसविणे – 3 लाख, अरुळे मुख्य रस्ता ते बबन हुंबे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता तयार करणे – 10 लाख, सोनधरणे येथे रस्ता तयार करणे – 10 लाख, तांबळघाटी येथे रस्ता तयार करणे – 5 लाख, शिराळे शिंदेवाडी येथे रस्ता करणे – 4 लाख, शिराळे शेळकेवाडी येथे रस्ता करणे – 10 लाख, कुर्ली खडकदारा रस्ता तयार करणे – 14 लाख, कुर्ली खडकदरा रस्ता मातीकरण व मो-या बांधणे -15 लाख, कुर्ली खडकदरा उर्वरित रस्ता करणे – 5 लाख, खांबाळे दारिया रस्ता तयार करणे – 34 लाख, खांबाळे हेदीचे टेम रस्ता करणे – 5 लाख, वाभवे – वैभववाडी नगरपंचायत हद्दीत भैरू गुरखे यांच्या घरापर्यंत रस्ता करणे 50 लाख, नापणे धनगरवाडा येथे रस्ता करणे – 15 लाख, उंबर्डे धनगरवाडा येथे रस्ता करणे – 10 लाख, वांयबोशी स्वतंत्र अंगणवाडी बांधणे – साडेबारा लाख, गुरखेवाडी नळ योजना करणे, वायबोशी येथे स्ट्रीट लाईट बसविणे – 5 लाख, वायबोशी लांबोर यांच्या घरापर्यंत रस्ता करणे- 5 लाख. आदी सर्व कामे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत.
