You are currently viewing माटणे मतदारसंघात बाबुराव धुरी यांचा झंझावाती प्रचार

माटणे मतदारसंघात बाबुराव धुरी यांचा झंझावाती प्रचार

*माटणे मतदारसंघात बाबुराव धुरी यांचा झंझावाती प्रचार*

दोडामार्ग

माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात बाबुराव धुरी यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली असून, “आपला माणूस” म्हणून ते घरोघरी पोहोचले आहेत. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत एकहाती प्रचार करत बाबुराव धुरी यांनी मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत आपली मशाल पोहोचवली आहे. त्यांच्या या मेहनतीला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रचारात त्यांचा जलवा ठळकपणे दिसून येतोय.
गावोगावी, वाड्या-वस्त्यांमध्ये थेट भेटी, संवाद, समस्या ऐकून घेणे आणि त्यावर उपायांची स्पष्ट भूमिका मांडणे—या पद्धतीने बाबुराव धुरी यांनी प्रचाराची वेगळी छाप पाडली आहे. “आमचो बाबुराव… ह्योच आमचो विश्वास आणि ह्योच आमचो चिन्ह” असा सूर मतदारांच्या तोंडी ऐकायला मिळत असून, सामान्य कार्यकर्त्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्तरांतून त्यांना ठाम पाठिंबा मिळतोय.

स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, “कोणी काहीही म्हणो, काहीही करो—आमचा पाठींबा बाबुराव धुरी यांनाच.” विकासाभिमुख दृष्टिकोन, सर्वसामान्यांशी थेट नाळ, आणि सातत्याने केलेले सामाजिक काम यामुळे बाबुराव धुरी यांच्यावरचा विश्वास अधिक बळकट झाला आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी मांडलेली ठोस भूमिका मतदारांना भावते आहे.

प्रचारादरम्यान बाबुराव धुरी यांनी युवक, महिला, शेतकरी आणि कामगार वर्गाशी स्वतंत्र संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “विकास हा घोषवाक्यापुरता न राहता प्रत्यक्षात दिसला पाहिजे,” असे सांगत त्यांनी स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.

एकूणच, माटणे मतदारसंघात बाबुराव धुरी यांचा झंझावाती प्रचार सुरू असून, घरोघरी पोहोचलेली मशाल आणि जनतेचा विश्वास हेच त्यांच्या प्रचाराचे बळ ठरत आहे. येत्या निवडणुकीत हा जनाधार कौलात कसा परिवर्तित होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा