वैभववाडीत आज 4 वा. महायुतीची सभा
पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
वैभववाडी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे महायुतीची सभा आज सायंकाळी 4 वा. होणार आहे. यावेळी पालकमंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. ही सभा वैभववाडी भाजपा कार्यालयासमोर होणार आहे. यावेळी जिल्हा व तालुक्यातील भाजपा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभेला भाजपाचे सर्व अधिकृत उमेदवार, महायुतीचे तसेच भारतीय जनता पार्टी, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ अध्यक्ष, सोसायटी चेअरमन, संचालक, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केले आहे.
