You are currently viewing पियाळीत महाविकास आघाडीचा प्रचार धडाका; अनंत पिळणकर–कीर्ती एकावडे यांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त आशीर्वाद
Oplus_16908288

पियाळीत महाविकास आघाडीचा प्रचार धडाका; अनंत पिळणकर–कीर्ती एकावडे यांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त आशीर्वाद

फोंडा जि. प. मतदारसंघात घरोघरी संपर्क; महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पियाळीवासीयांचा भक्कम पाठिंबा

कणकवली :

फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघातील लोरे पंचायत समिती अंतर्गत पियाळी गावामध्ये फोंडा जिल्हा परिषदेसाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनंत पिळणकर तसेच लोरे पंचायत समितीच्या उमेदवार कीर्ती कृष्णा एकावडे यांनी घरोघरी जाऊन जोरदार प्रचार केला. या प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांनी पियाळी गावातील नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेत आशीर्वाद मागितले.

या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला विभागाच्या तालुकाप्रमुख माधवी दळवी, उपतालुकाप्रमुख संजना कोलते, सिद्धेश राणे, शाखाप्रमुख निलेश राणे तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे फोंडा विभाग प्रमुख रमेश राणे, प्रकाश उर्फ बबन नारकर, प्रवीण गुरव, संजय बंदरकर उपस्थित होते.

तसेच घोणसरीचे माजी सरपंच कृष्णा एकावडे, घोणसरी ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन मेस्त्री, प्रकाश मडवी, विशाल राणे, प्रीतम राणे, गौरव एकावडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महाविकास आघाडीच्या या घरोघरी प्रचाराला पियाळीवासीयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद अधिक भक्कम होत असल्याचे चित्र दिसून आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा