You are currently viewing सख्ख्या भावाच्या खून प्रकरणात संशयितास जामीन मंजूर

सख्ख्या भावाच्या खून प्रकरणात संशयितास जामीन मंजूर

सख्ख्या भावाच्या खून प्रकरणात संशयितास जामीन मंजूर

ऍड. अशपाक शेख यांचा यशस्वी  युक्तिवाद

कुडाळ

कसाल, बालमवाडी येथील युवक सचिन श्रीकांत भोसले यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी भा.दं.वि. कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक 14/03/2023 रोजी सकाळी सचिन हा घरात मृतावस्थेत आढळून आला होता. त्याच्या कान व नाकातून रक्तस्राव होत असून मानेवर गंभीर जखम आढळल्याने अज्ञात व्यक्तीने हत्याराने वार करून त्याची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या संदर्भात मयताची बहीण श्रीमती राधिका श्रीकृष्ण धुरी यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता प्रथम पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली होती. पुढे तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर आरोपीच्या वतीने जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला.

आरोपीचे वकील अॅड. अशपाक शेख यांचा युक्तिवाद ग्राह्य

धरून ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मा. न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी दिनांक 28/01/2026 रोजी आरोपीस 50 हजार रुपयांच्या जामिनावर व अटी-शर्तींसह जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला. सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी काम पाहिले असून अॅड. नामदेव मठकर, अॅड. पंकज खरवडे, अॅड. विनय रजपूत व अॅड. कैस शेख यांनी त्यांना सहाय्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा