You are currently viewing सुगंध “उरला” आठवणीत

सुगंध “उरला” आठवणीत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सुगंध “उरला” आठवणीत*

(756)

 

नाव असून *अजीत* त्यांचे

झाले पराजित “मृत्यू” समोर

दिले आयुष्य जगले मस्तीत

कामही केले मरे मरेस्तोवर

//1//

कोंबड्यासारखा अखंड जागा

बाहेर पडायचा उजाडण्या आधी

घेऊन फैलावर *अधिका-यांना*

नाही सोडायचा *ढीला कधी*

//2//

दरारा असायचा *दादागिरीचा*

शब्द जायचा *अधीक उणा*

लक्षात येता गैर *परीणाम*

साॅरी म्हणायचा मिटून *फणा*

//3//

महत्त्वाकांक्षा होती *जरूर*

कष्ट उपसले *त्या करीता*

झाला जरी उपमुख्य सहादा

थांबला नाही मुख्यपदाकरीता

//4//

रोखठोक म्हणजे असते काय

दादांचे उदाहरण बोलके हाय

लावून भिंगरी सतत पायाला

दुधावरची खायचे खमंग साय

//5//

बसले जाऊन जरी स्वर्गात

*सुगंध उरला आठवणीत*

खणखणीत नाणे अर्थ मंत्र्यांचे

नाही गवसत कुठल्या खाणीत

//6//

 

विनायक जोशी🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा