*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तिर्थ ….रक्ताचं…!!*
अब्रुदार प्रेतांच्या हातचा
आज मी.. मांजा झालोयं
अक्षर गर्द.. लाल झालीत
हजार जखमांना बोलतं केलयं
माझी अक्षर प्रेतताटीवरून
स्वतःहूनच ताडकन उठतांत
अन्… थेट सरणावर जावून
ताठ कण्याने…उभ्याने चढतांत
माझ्या पुस्तकांची जुनी पाने
आज मला भेटायला आलीत
टाळतोय… मी त्यांना
हा धक्का! ते सहन करणार नाहीत
वास्तवाच लिखाण मला
जिवंत राहून.. मरण देत
स्वतः च रक्त ही ..स्वस्तांत
तिर्थ म्हणून ..वाटावं लागत
जन्मागत मरण येत किरवंताला
पिंजऱ्यातं कैद लाल लेखणीला
रक्ताचं भान ..तिर्थाला लाभलं
माखलेलं लिखाण.. शोधतं मला
मज्जारज्जूतील अस्मिता लोपली
वज्रमूठीचं रणकंदन संपवलं..मी
बाबा ठाकूर
