You are currently viewing वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयात बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाचे उद्घाटन

वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयात बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाचे उद्घाटन

*कॉज टू कनेक्ट फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम…*

कणकवली :

विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विविध कला-कौशल्य आत्मसाद असतील तर ते कोणत्याही क्षेत्रात कमी पडणार नाहीत हा विद्यार्थी हिताय हेतू समोर ठेवून वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,तळेरे येथे यावर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष 25-26 पासून “बहूविध कौशल्य अभ्यासक्रम” सुरू करण्यात आला आहे.

या अभ्यासक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी हा अभ्यासक्रम सिंधुदुर्गात यशस्वीरित्या सुरू राहण्यासाठी पालकत्व स्वीकारलेले प्रसाद देवधर,तरुण भारतचे संपादक व सिंधुदुर्ग रत्नागिरी आवृत्तीप्रमुख शेखर सामंत,तळेरे गावचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉ.मिलिंद कुलकर्णी, या अभ्यासक्रमाचे जिल्हा समन्वयक सूचित भोगले,तळेरे सरपंच हनुमंत तळेकर,माजी सरपंच चंद्रकांत तळेकर,शशांक तळेकर,पत्रकार उदय दूदवडकर, माईंड ट्रेनर सदाशिव पांचाळ,श्रावणी कम्प्युटरचे सर्वेसर्वा सतीश मतभावे,शाळा स.सदस्य शरद वायंगणकर,निलेश सोरप,प्राचार्य अविनाश मांजरेकर,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी कार्यक्रमात अभ्यासक्रमाची थोडक्यात रूपरेषा समजावून सांगितली. प्रसाद देवधर,शेखर सामंत,डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी या बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाचे महत्व तसेच विद्यार्थ्यांना या कौशल्याची असणारी आवश्यकता आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

ग्रामीण भागातील अनेक युवक-युवती शिक्षण व रोजगार व मार्गदर्शन या संधींपासून दूर राहतात.ही दरी भरून काढण्यासाठी भगीरत प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने व कॉज टू कनेक्ट या फाउंडेशन ने “स्किल ऑन व्हील” हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण ग्रामीण भागातल्या शाळांपर्यंत नेणे,ग्रामीण युवकांना स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर बनवणे,रोजगारक्षम बनवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

यामध्ये एक मोबाईल व्हॅन आहे,ती आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असते.यामध्ये संगणक, स्क्रीन,इंटरनेट,तसेच इतर प्रशिक्षणासाठीच्या अनेक वस्तू उपलब्ध करण्यात आल्या आहेत.तसेच या अभ्यासक्रमासाठी कणकवली तालुक्यातून कमलेश बिडये व कासले हे दोन प्रशिक्षक नेमण्यात आलेले आहेत.

हा कार्यक्रम प्रशालेच्या डॉ.एम.डी.देसाई सांस्कृतिक भवनात पार पडला.कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन व आभार प्रशालेच्या सहा.शिक्षिका सुचिता सुर्वे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा