*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जगणे मरणे – एक गणित*
जगण्यासाठी जन्म घेतला
मरणाच्या दारी
अरे कुणीतरी हो
मला दाखवा
जगण्याची पायरी
जगणे मरणे अंतर हे
एका श्वासाचे
परि कुणी नाही हो
इथे कुणाचे एकमेकांचे
रीत कशी ही जगावेगळी
जगण्या मरणाची
आस असे इथे जगण्याची
अन् भिती मरणाची
जगणे नकोसे वाटे तेंव्हा
मरण जाई दूर
जगण्याचा खरा अर्थ कळे
तेंव्हा काळ नेई दूर
गणित सुटेना जगण्याचे
अन् कोडे मरणाचे
जगून घ्यावे आनंदी जीवन
भय नसावे मरणाचे
जगण्यासाठी जन्म घेतला
मरणाच्या दारी
कुणीतरी हो मला दाखवा
जगण्याची पायरी
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
