*लेखक कवी पत्रकार ॲड रुपेश पवार लिखित भावस्पर्शी काव्यरचना*
कै. श्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
*काळ*
काळ एक अशी गोष्ट
ती सर्वांच्याच आयुष्यात येते
ती कुणासाठी थांबत नाही
कुणाचीही वाट बघत नाही ।।१।।
काळ एक अशी गोष्ट
ती सर्वांच्याच आयुष्यात येते
काळ वेळेचे काटे
पुढे जात असतात
आपण मात्र त्यांच्या
मागे धावत असतो
आपण त्यांच्या पुढे
कधीच जात नाही ।।२।।
काळ एक अशी गोष्ट
ती सर्वांच्याच आयुष्यात येते
काळ काय आणत नाही
काळ प्रगती आणतो
काळ अधोगतीला नेतो
काळ क्रांती घडवतो
परिवर्तन आणतो. ।।३।।
काळ एक अशी गोष्ट
ती सर्वांच्याच आयुष्यात येते
काळाला आपण काहीच
करू शकत नाही
काळ आपल्या तालावर नाचतो
अन् दुसऱ्यांनाही नाचवतो
काळ असाच असतो ।।४।।
काळ एक अशी गोष्ट
ती सर्वांच्याच आयुष्यात येते
कवी ॲड.रुपेश पवार
9930852165
