मनसे ,सिंधुदुर्ग च्या वतीने अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धाजंली…
दादा ह्या वेळी मात्र घड्याळाची वेळ चुकलीच…..
महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत धुरंधर, बुलंद आवाज आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले नेते अजित पवार यांच्या निधनाने राज्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. भल्या पहाटे कामाला लागणारा, अभ्यासू आणि विकासकामांसाठी झटणारा नेता हरपला असल्याची प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी व्यक्त केली.
या घटनेने सर्व स्तरांतून दुःख व्यक्त केले जात आहे.
अजित दादा हे त्यांच्या कामाच्या प्रचंड उरकेसाठी आणि अधिकाऱ्यांवर धाक राखण्यासाठी ओळखले जात होते..
विकासकामांचा ध्यास: महाराष्ट्राच्या राजकारणात एक धुरंदर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती, जे आपल्या कामातून ठसा उमटवत असत.
सर्वसामान्यांचा नेता, गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे राजकारण हलवणारा एक नेता हरपला. त्यांच्या अकाली निधनाने राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, त्याच्या कार्यकर्त्यांना आणि कुटुंबीयांना या दुखःद घटणेतुन सावरण्याची ताकद ईश्वर देवो..
