You are currently viewing निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांदा पोलिसांची मोठी कारवाई

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांदा पोलिसांची मोठी कारवाई

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांदा पोलिसांची मोठी कारवाई

इन्सुली चेकपोस्टवर गोवा बनावटीचा ५२ लाखांचा दारूसाठा व १५ लाखांचा टँकर जप्त, चालक ताब्यात

​बांदा

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत.याचाच एक भाग म्हणून बांदा पोलिसांनी इन्सुली चेकपोस्टवर मोठी कारवाई केली असून, गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारूसाठ्यासह एक टँकर जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ६७ लाख १० हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एकाला ताब्यात घेतले आहे.
​निवडणुकीच्या काळात होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमेवर वाहन तपासणी तीव्र केली आहे. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास इन्सुली चेकपोस्ट येथे तपासणी सुरू असताना संशयास्पद वाटणारा टँकर (जीजे १२ एवाय २३६५) अडविण्यात आला. या टँकरची सखोल झडती घेतली असता, त्यात गोवा बनावटीच्या ‘ओल्ड मंक’ दारूचे ४६० बॉक्स आणि ‘किंगफिशर’ बिअरचे १२० बॉक्स आढळून आले. या दारूसाठ्याची एकूण किंमत ५२ लाख १० हजार ४०० रुपये इतकी आहे. दारूसोबतच १५ लाख रुपये किमतीचा टँकरही पोलिसांनी जप्त केला आहे.​या प्रकरणी पोलिसांनी टँकर चालक जोरा निंबा राम (वय ५३, रा. राजस्थान) याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध बांदा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे आणि त्यांच्या पथकाने केली

प्रतिक्रिया व्यक्त करा