प्रत्यक्ष मैदानात न उतरता गणेशप्रसाद गवसांची बिनविरोध विजयी धडक
दोडामार्ग :
दोडामार्ग तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. सोशल मीडियावरून आक्रमक भूमिका, ठाम मते आणि प्रभावी संवाद साधणारे शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी यावेळी प्रत्यक्ष निवडणूक लढवली नसली, तरी राजकीय विजय मात्र त्यांच्या पारड्यात पडला आहे.
कोलझर पंचायत समिती मतदारसंघात इतर सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने गणेशप्रसाद गवस यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. विशेष बाब म्हणजे, दोडामार्ग तालुक्यातील सहा पंचायत समिती मतदारसंघांमध्ये सर्वप्रथम बिनविरोध निवडून येण्याचा मान त्यांनी पटकावला आहे.
संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांशी असलेली घट्ट नाळ आणि जनतेमधील विश्वास यांचे हे फलित असल्याचे बोलले जात आहे. या विजयामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, दोडामार्ग तालुक्यात शिवसेनेचे राजकीय स्थान अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
