वेंगुर्ला :
आडेली पंचायत समिती मतदारसंघातून सर्वसाधारण जागेसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून नितीन मांजरेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. आडेली मतदारसंघाकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या मतदारसंघात पंचायत समितीसाठी शिवसेनेतर्फे उमेश नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मंगळवार, २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार उमेश नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
त्यामुळे या मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले नितीन मांजरेकर यांना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
