आज उद्याही नितेश साहेबांसोबत …..
संतोष कानडे यांच्या स्टेटसला लागलेले पोस्टर व्हायरल…
अपक्ष उमेदवारी घेतली मागे
कणकवली :
भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी फोंडाघाट, हरकुळ खुर्द उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी आज शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे. श्री. कानडे यांनी आपल्या व्हाटसप स्टेट्सला काल, आज उद्याही नितेश साहेबांसोबत .. अशा आशयाचे स्टेटस ठेवले आहे.
संतोष कानडे यांच्या व्हाट्सअप स्टेटसमध्ये खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबतचे फोटो असून दाखवाल ती दिशा.. सांगाल तो मार्ग.. द्याल ती जबाबदारी.. शब्द ही भावना होती. निष्ठा ही श्रद्धा आहे. काल आज उद्याही नितेश साहेबांसोबत असा मजकूर आहे. फोंडाघाट आणि हरकुळ जि प मतदारसंघात कानडे यांनी अपक्ष उमेदवारी देखील दाखल केली होती. या दोन्ही अपक्ष उमेदवारी अर्ज माघार घेतली.
