*पारिजात साहित्य समूह संचालिका कवयित्री शबाना मुल्ला लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रजासत्ताक भारत*
शाश्वत आहे स्वातंत्र्याचा मुकुट शिरावर मानाचा
लहरत आहे अभिमानाने झेंडा अमुच्या देशाचा
नागरिकांच्या अधिकारांचे पालन होते शिस्तीने
कोणीही ना वावरतो मग अनिष्टतेच्या भीतीने
समानतेने केला जातो इथे निवाडा न्यायाचा
लहरत आहे अभिमानाने झेंडा अमुच्या देशाचा
अभिव्यक्तीची पूर्ण मुक्तता इथे लाभते जनतेला
जगात आहे उज्वलतेचे स्थान आपल्या घटनेला
मूल्याधिष्ठित संविधान हा आत्मा आहे राष्ट्राचा
लहरत आहे अभिमानाने झेंडा अमुच्या देशाचा
प्रत्येकाच्या अस्तित्वाचे केले जाते मोल इथे
बडवत नाही कोणी तितका धर्माचा पण ढोल इथे
श्रमिक येथले मातीमध्ये घाम गाळती कष्टाचा
लहरत आहे अभिमानाने झेंडा अमुच्या देशाचा
माणुसकीचे बंध जोडुनी श्वास घेउया स्वच्छंदी
सौजन्याने शांती पूर्वक जीवन जगुया आनंदी
करू साजरा रम्य सोहळा पदरी पडल्या हक्कांचा
लहरत आहे अभिमानाने झेंडा अमुच्या देशाचा
शबाना मुल्ला नेरूळ
